नारायणगाव – येथे ग्रामदैवत मुक्ताबाई मंदिरासमोर अंडी फेकून वाढदिवसाच्या नावाखाली धिंगाणा घालणाऱ्या सहा जणांवर नारायणगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सकलेन नासिर आत्तार, साकीर आमीन जमादार, आरमान खालीद शेख, मोईन एकलाक आत्तार, मोसीन फिरोज ईनामदार, जाहीद पिरमंहम्मद पटेल (सर्व रा. नारायणगाव) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे.
पोलीस कॉन्स्टेबल सचिन कैलास कोबल यांनी फिर्याद दिली. मुक्ताबाई मंदिराच्या परिसरात राहणाऱ्या सकलेन नासिर शेखच्या वाढदिवशी मंदिरापुढे अंडी फेकून धिंगाणा घालतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
त्याबाबत एका जवाबदार नागरिकाने पोलिसांना ही माहिती देऊन कारवाई करण्याची मागणी केली असता पोलिसांनी तात्काळ कारवाई केली.