पुणे – कोविड काळात घरातील कामाबरोबर न्यायालयीन कामे करत दुहेरी भूमिक बजावणाऱ्या महिला वकिलांचा आणि पुणे बार असोसिएशननेही चांगल्या प्रकारे कार्य केल्याबद्दल अध्यक्षांचा सन्मान करण्यात आला.
महिला वकिलांकडून तुकाई देवीची आरती, बानेश्वराचे दर्शन, तसेच बाणेर बालेवाडीचे वैभव तुकाई टेकडी येथे भटकंती करण्यात आली. या भागातील सर्व पक्षीय नेत्यांनी वकील वर्गाचे स्वागत केलं. त्यानंतर बालेवाडी येथे थाट बाट या हॉटेल मध्ये ऍड. पांडुरंग थोरवे यांचेकडून महिला नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा आणि इतर मान्यवरांचा सन्मान पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. सतीश मुळीक, उपाध्यक्ष ऍड. योगेश तुपे, ऍड. उपाध्यक्ष सचिन हिंगणेकर, वेस्टर्न वकील संघाचे अध्यक्ष ऍड. दिलीप शेलार , ऍड. नितीन कोकाटे यांचे हस्ते करण्यात आला.
यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पुणे शहर सरचिटणीस ऍड. वैशाली सिंघवी, राष्ट्रवादी कॉंग्रेस लेगल सेल कार्यकारी सदस्य ऍड. सोनाली घाडगे, पिंपरी चिंचवड शहर नोटरी असोसिएशनच्या सरचिटणीस ऍड. पुनम स्वामी, ब्रॅंड ऍम्बॅसॅडर शॉर्ट फिल्म भावना तसेच ग्लामर आयकॉन अवॉर्ड 2021 च्या ऍड . सुरेखा भोसले, छावा स्वराज्य सेनाच्या जिल्हाध्यक्ष ऍड. सुषमा यादव, संघटक सचिव राष्ट्रवादी लीगल सेल ऍड. श्रुती कांबळे आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष ऍड प्रफुल्ल पोतदार यांचा सन्मान शाल आणि सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला.
ऍड. कविता कापुरे, ऍड. तृप्ती कांबळे, ऍड. वैशाली रेड्डी, ऍड. स्नेहा ढसाळ, ऍड. स्मिता भोसले, ऍड. रुपाली वाणी, ऍड. चंदा मांढरे, ऍड. वैशाली वाघमारे, ऍड. रेणुका राजपूत ऍड. प्रेरणा शिंदे , ऍड. प्रियांका बेरड , ऍड. वंदना डोंबरे, ऍड. सुजाता गायकवाड, ऍड. शितल भुतडा, ऍड..सुनंदा वाजे, ऍड. शिला दळवी, ऍड. रुपाली वायकर , ऍड. गीता जैस्वाल, ऍड. ललिता गोटे, ऍड. शीला दळवी यांचाही सन्मान सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजनामध्ये ऍड. हनुमंत दगडे, ऍड. नंदा हुंबरे, ऍड. शिल्पा कदम यांनी मोलाचा वाटा घेतल्यामुळे त्यांचा ही विशेष सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन पुणे बार असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष ऍड. संतोष जाधव यांनी केले.