पुणे- पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 कार्यालयात कार्यरत सहायक पोलीस उपनिरीक्षक विजय भोंग, पोलीस हवालदार सुनील शिंदे व पोलीस नाईक मंगेश बोऱ्हाडे यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह मिळाल्याबद्दल कर्तव्य फाउंडेशनतर्फे सत्कार करण्यात आला.
तिन्ही पोलीस अधिकाऱ्यांनी पोलीस दलात केलेली सेवा व प्रामाणिक कार्य याची दखल घेऊन त्यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. यानिमित्ताने कर्तव्य फाउंडेशनतर्फे लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांच्या हस्ते शाल व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष विकास भांबुरे, कार्याध्यक्ष अशोक देशमुख उपस्थित होते.