मुंबई: महाराष्ट्र पोलीस खात्याने एजाज युसुफ लकडावाला या कुख्यात गुंडाला काल रात्री पाटणा येथे अटक केली. दाऊद, छोटा राजन, छोटा शकील यांच्या सोबत तो काम करत होता आणि नंतर विभक्त होऊन स्वतंत्रपणे काम करू लागला. त्याच्यावर खंडणीचे व अनेक गंभीर गुन्हे आहेत.
दरम्यान, एजाज लकडावाला याच्यासारख्या कुख्यात गॅंगस्टरला पकडणे, हे पोलीस खात्याचे मोठे यश आहे. याबद्दल पोलीस अभिनंदनास पात्र आहेत. संबंधित पोलीस अधिकाऱ्यांचे विशेष कौतुक केले जाईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.
देशमुख म्हणाले, लकडावाला याची मुलगी शिफा शेख हिला आधी पकडण्यात आले. तिने खोटे पासपोर्ट बनवले होते, त्या गुन्ह्यात तिला पकडण्यात आले. आता लकडावला याचे अजून कोणत्या गुन्हेगारांशी आणि गँगस्टर सोबत कनेक्शन आहेत का, हे तपासले जाईल. ‘वाँटेड’ गॅंगस्टर एजाज युसूफ लकडावाला याला मुंबई पोलिसांनी काल रात्री पाटणा येथे केली अटक त्याच्याविरुध्द २५ खंडणीचे गुन्हे,विविध ८० तक्रारी,’मोक्का’ अन्वये काही गुन्हे दाखल आहेत. अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.