ब्रुस ली, जॅकी चॅन आणि जेट ली यांच्यासारख्या ग्रेट मार्शल आर्टिस्टबरोबर गणना झाल्यामुळे विद्युत जमवाल फुल्ल टू फॉर्मात आहे.
View this post on Instagram
आता त्याला थेट हॉलीवूडमधून ऑफर यायला लागल्या आहेत. जगातील सर्वात प्रतिष्ठित वंडर स्ट्रीट या टॅलेंट मॅनेजमेंट एजन्सीकडून दखल घेतला गेलेला तो एकमेव भारतीय ऍक्शन हिरो आहे.
View this post on Instagram
या एजन्सीकडून निवडल्या गेलेल्या हिरोंमध्ये टोनी जा, मायकेल जा व्हाईट आणि डॉल्फ लंग्रेनसारख्या कलाकारांचा समावेश आहे. या सर्व मंडळींनी सिनेमाच्या माध्यमातून मार्शल आर्टचा जगभर प्रसार केला आहे.
View this post on Instagram
हेच काम विद्युत जमवाल कलरीपट्टूच्याबाबतीत करतो आहे. गेल्या वर्षी या सर्व मातब्बर कलाकारांबरोबर विद्युत जमवालचा ऑनलाइन संवाद झाला.
View this post on Instagram
हॉलीवूडमध्ये आता फिटनेस स्टारसाठीही अशाच प्रकारे मोठी संधी उपलब्ध होते आहे. या निकषावर विद्युत जमवाल हॉलीवूडमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
View this post on Instagram
याशिवाय तो आता आपल्या स्वतःच्या ऍक्शन हिरो फिल्म्स या बॅनरखाली निर्मिती क्षेत्रातही उतरतो आहे. या बॅनरसह हॉलीवूडच्या काह बॅनरच्या सहकार्याने तो सहनिर्मिती करणार आहे.
View this post on Instagram
बॉलीवूडमधील एखाद्या ऍक्शन हिरोला हॉलीवूडमध्ये अशाप्रकारची संधी मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.