Kingdom of the Planet of the Apes : माकडांनी बनवल साम्राज्य अन् मानव बनले’ वाचून तुम्हाला विचित्र वाटू शकते. पण ही स्टोरी येत्या काही दिवसांत प्रेक्षकांना पडद्यावर पाहायला मिळणार. 2023 हे वर्ष 2024 सारखेच अप्रतिम असणार आहे, ज्यामध्ये असा चित्रपट येणार आहे. किंगडम ऑफ द प्लॅनेट ऑफ द अॅप्सचा ‘ ट्रेलर पाहून चाहते आधीच या चित्रपटाला ब्लॉकबस्टर म्हणत आहे. हा चित्रपट एका माकड नेत्याची कथा सांगतो जो हरवलेल्या मानवी तंत्रज्ञानाचा शोध घेतो.
‘हा चित्रपट ‘किंगडम ऑफ द प्लॅनेट ऑफ द अॅप्स’ कथा आहे, जो 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहे. त्याचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला असून, त्याला लोकांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. एका युजरने लिहिले की, ‘नक्कीच हाच चित्रपट आहे ज्याची मी पुढच्या वर्षी खूप आतुरतेने वाट पाहत आहे. मला खूप आनंद आहे की, त्यांनी संपूर्ण फ्रेंचायझी रीबूट केली नाही.’
दिग्दर्शक वेस बॉलने मंकी सीझरच्या कारकिर्दीनंतर भविष्यात अनेक पिढ्या सेट केलेल्या जागतिक फ्रेंचायझीमध्ये आता पुन्हा एक नवीन कथेचा समावेश झाला आहे. ‘किंगडम ऑफ द प्लॅनेट ऑफ द अॅप्स’ स्टार्स ओवेन टीग (“आयटी”), फ्रेया ऍलन (“द विचर”), केविन ड्युरंड (“लॉक अँड की”) यांनी अभिनय केला आहे.