पिंपरी – लसीकरण कामकाजाची साप्ताहिक सुट्टी असल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेची सर्व करोना प्रतिबंधक लसीकरण केंद्रे बुधवारी (दि.30) बंद राहणार असल्याचे महापालिकेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविले आहे.
कोविड 19 या आजारावर केंद्र शासन व राज्य शासनाच्या प्राप्त मार्गदर्शक सूचनांप्रमाणे 16 जानेवारी 2021 पासून आरोग्य कर्मचारी, 2 फेब्रुवारीपासून आघाडीचे कर्मचारी, 1 मार्चपासून 60 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण तसेच 1 एप्रिल 2021पासून 45 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण आणि 1 मेपासून 18 ते 44 वयोगटातील सर्व नागरिकांचे कोविड लसीकरण करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे. शासन मार्गदर्शक सूचनांनुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर नागरिकांचे कोविड 19 लसीकरण करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. उद्या बुधवारी(दि.30) लसीकरण कामकाजाची साप्ताहिक सुट्टी करण्यासाठी महापालिकेची सर्व लसीकरण केंद्रे बंद राहणार आहेत.