Holi Landslide । हिमाचल प्रदेशमध्ये होळीच्या दिवशी मोठी दुर्घटना घडली आहे. याठिकाणी होला मोहल्ला कायक्रमात भूस्खलनामुळे दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येतीय. तर या दुर्घटनेत सात जण गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येतंय. उना जिल्ह्यातील आंब उपविभागातील मेडी येथे होळीच्या निमित्ताने होळा मोहल्ला सुरू आहे. त्याचवेळी ही दुर्घटना घडली. जखमींना उना येथील प्रादेशिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेमुळं भाविकांमध्ये चेंगराचेंगरी Holi Landslide ।
वास्तविक, होळीच्या दिवशी सोमवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास आंब येथील मेडी मेळा सेक्टर क्रमांक 5 मधील चरणगंगेत पवित्र झऱ्यात भाविक स्नान करत होते. दरम्यान, अचानक डोंगरावरून दगड पडू लागले. डोंगरावरून दगड पडत असल्याचे पाहून भाविकांमध्ये चेंगराचेंगरी झाली असून चरणगंगेत स्नान करणारे ९ भाविक जखमी झाले आहेत. सर्व जखमींना सिव्हिल हॉस्पिटल आंब येथे उपचारासाठी आणण्यात आले, त्यापैकी दोन भाविकांचा मृत्यू झाला. तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना उना प्रादेशिक रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे.
अतिरिक्त पोलिस अधीक्षक संजीव भाटिया यांनी सांगितले की, डोंगरावरून घसरल्याने जखमी झालेल्या भाविकांपैकी दोघांचा मृत्यू झाला आहे, तर इतरांवर उपचार सुरू आहेत.
हेही वाचा
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भस्म आरतीच्या वेळी गर्भगृहात आग ; पुजाऱ्यासह १३ जण होरपळले
अपघातातील जखमींची अन् मृतांची यादी Holi Landslide ।
या अपघातात गोविंद रा. बरनाळा, धर्मिंदर सिंग, रा.सोल जि. तरनतारन, हरपाल सिंग रा. अमृतसर आणि बबलू (17) हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बलवीर सिंग रा. निदान पोस्ट ऑफिस खेड जिंद, हरियाणा, अंगरेज सिंग रा. भरड तहसील अजनाळा जि. अमृतसर आणि रघुबीर सिंग रा. रोडी कपुरा जि. फरीदकोट प्रादेशिक रुग्णालयात गंभीर स्थितीत आहेत. बिला रा. फरीदकोट पंजाब आणि बलवीर चंद रा. फरीदपूर, जालंधर पंजाब यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे.