Kriti Sanon Viral Photo| अभिनेत्री क्रिती सेनॉनचे अभिनयासह तिच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत. चित्रपटातील विविध भूमिकेतून ती प्रेक्षकांची मनं जिकंते. मात्र सध्या क्रितीच्या आगामी चित्रपटाची नाही तर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चा रंगली आहे. सध्या सोशल मीडियावर क्रितीचा एक फोटो व्हायरल होत आहे ज्यात तिच्यासोबत एक तरुणही दिसत आहे. मात्र या फोटो दोघेही पाठमोररा उभे असल्याचे दिसत आहे. या फोटोतील तरुणाला क्रिती डेट करत असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोतील दिसणारी तरुणी क्रिती असल्याचा दावा केला जात आहे. व्हायरल झालेला फोटो लंडनमधील असून ती एका तरुणाबरोबर हात हातात घेऊन चालताना दिसत आहे. या फोटोमध्ये दोघांचाही चेहरा दिसत नाही. पण क्रितीच्या टीमचे काही लोक त्यांच्या आजूबाजूला असल्याने ती क्रितीच आहे, अशी चर्चा आहे. तसेच या फोटोतील तरुण कबीर दहिया असल्याचे म्हंटले जात आहे.
कोण आहे मिस्ट्री मॅन ?
कबीर ब्रिटनमध्ये राहतो आणि त्याचे वडील प्रसिद्ध व्यावसायिक आहेत. तसेच कबीरचे क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनी आणि साक्षी धोनी यांच्याशीही संबंध आहेत. कबीर साक्षी धोनीचा जवळचा मित्र आहे आणि दोघेही अनेकदा एकत्र दिसतात.
क्रिती व कबीर यांच्या वयात सुमारे 10 वर्षांचं अंतर आहे. क्रिती व कबीर दोघेही २०२२ च्या अखेरीसपासून एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. पण कबीर किंवा क्रितीने दोघांचे कधीच एकत्र फोटो शेअर केलेले नाहीत किंवा त्यांच्या नात्याबद्दल कधी काही विधानही केले नाही. त्यामुळे या चर्चांबाबत कितपत सत्यता आहे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, लवकरच क्रिती ‘द क्रू’ चित्रपटात दिसणार आहे. यात तिच्यासोबत करीना कपूर आणि तब्बू मुख्य भूमिकेत आहेत.
हेही वाचा:
क्रिती सेनॉन 10 वर्षांनी लहान तरुणाला करते डेट? लंडनमधील ‘तो’ फोटो व्हायरल