एक जुलैपासून हुसेन चषक अखिल भारतीय निमंत्रित हॉकी स्पर्धेस सुरूवात

पुणे – परगावच्या आठ संघांसह एकूण 22 संघ हुसेन चषक अखिल भारतीय निमंत्रित हॉकी स्पर्धेत सहभागी होणार आहेत. पिंपरीतील नेहरूनगर येथील मेजर ध्यानचंद हॉकी मैदानावर दि.1 जुलैपासून स्पर्धेला सुरुवात होईल.

हॉकी इंडिया आणि हॉकी महाराष्ट्रच्या वतीने हुसेन नबी शेख हॉकी अँड स्पोर्टस फाउंडेशनच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा सात जुलैपर्यंत चालणार आहे. या मुख्य स्पर्धेबराबेर 14 आणि 17 वर्षाखालील मुले, मुलींच्या गटातील स्पर्धा देखील घेण्यात येणार आहे.

विजेत्या संघाला आकर्षक करंडक देण्यात येणार आहे. हा नवा करंडक पूर्ण चांदीने बनविण्यात आला आहे. त्याचे वजन साधारण 4.5 किलो असून, अंदाजे किंमत 2.5 लाख रुपये इतकी असेल. परगाबच्या संघांमध्ये मुंबई रिपब्लिकन्स, मुंबई कस्टम्स, क्रीडा प्राधिकरण (गुजरात), नाशिक इलेव्हन, कोल्हापूर इलेव्हन यांचा समावेश आहे, या स्पर्धेनिमित्त मिरयन डिसुझा (हॉकी), निवृत्ती कैलबोर (कुस्ती), विशाल देसाई (स्केटिंग) यांचा विशेष गौरव केला जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.