पिंपरी – मोबाईल दुकानाचा पत्रा उचकटून दुकानातील वेगवेगळ्या कंपनीचे 72 हजार रुपयांचे मोबाईल चोरुन नेले. ही घटना 25 जून रोजी मध्यरात्रीच्या सुमारास कुदळवाडी येथील सागर मोबाईल शॉपीमध्ये घडली.
याप्रकरणी राहुल गोपीचंद वादवानी (वय-30 रा. काळेवाडी) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वादवानी यांचे कुदळवाडी, चिखली येथे सागर मोबाईल शॉपी हे दुकान आहे. दि.25जून रात्री ते 26 जून सकाळ दरम्यान चोरट्यांनी छताचा पत्रा उचकटून दुकानात प्रवेश केला व वेगवेगळ्या कंपनीचे 72 हजार रुपयांचे मोबाईल पळवले.