मुंबई – खासगी बॅंकांतील प्रवर्तकांना बॅंकातील भांडवलाचा 26 टक्के हिस्सा बाळगता येणार आहे. बॅंकेने घेतलेल्या या निर्णयाचे हिंदुजा समुहाने स्वागत केले आहे.
अगोदर प्रवर्तकांना बॅंकांमध्ये 15 टक्के भाग भांडवल ठेवता येत होते. इंडसइंड बॅंकेचे प्रवर्तक असलेल्या हिंदुजा समूहाने हे प्रमाण 26 टक्के पर्यंत वाढविण्याची मागणी केली होती.
हिंदुजा समूहातील अशोक हिंदुजा यांनी सांगितले की, रिझर्व्ह बॅंकेने घेतलेल्या या निर्णयामुळे ग्राहक, नियंत्रक आणि बॅंकांचाही फायदा होणार आहे. रिझर्व बॅंकेने घेतलेल्या या निर्णयामुळे बॅंका बळकट होतील. मात्र रिझर्व्ह बॅंकेने कंपन्यांना बॅंका सुरू करण्याची परवानगी पुन्हा एकदा नाकारली आहे.