लंडन – हिंदुजा उद्योग समुहाचे प्रमुख आणि बारतीय वंशाचे ब्रिटीश नागरिक एस.पी. हिंदुजा यांचे आज लंडनमध्ये निधन झाले. ते 87 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत ठिक नव्हती, असे त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले.
श्रीचंद परमानंद हिंदुजा हे हिंदुजा कुटुंबातील चार पुत्रांपैकी सर्वात ज्येष्ठ पुत्र आणि हिंदुजा समुहाचे अध्यक्ष होते. हिंदुजा कुटुंबाचे कुटुंबप्रमुख आणि एस.पी. हिंदुजा यांचे बंधू गोपीचंद हिंदुजा आणि प्रकाश हिंदुजा यांच्यावर स्विडीश शस्त्र उत्पादक एबी बोफोर्स यांच्याकडून सरकारी कंत्राट मिळवून देण्यासाठी तब्बल 81 दशलक्ष स्वीडीश क्रोना (स्विडीश चलन) इतकी दलाली घेतल्याचा आरोप होता. मात्र न्यायालयाने त्यांना दोषमुक्त केले होते.
हिंदुजा कुटुंबाचे प्रमुख आणि ज्येष्ठ बंधू एस.पी. हिंदुजा यांचे आज निधन झाले. हे कळवण्यास गोपीचंद, प्रकाश, अशोक आणि समस्त हिंदुजा कुटुंबाला अतीव दुःख होते आहे, असे हिंदुजा कुटुंबाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.