गायक- संगीतकार हिमेश रेशमियां आता गीत लेखन देखील करणार आहे. राजकुमार संतोषी यांच्या आगामी “बॅड बॉय’ सिनेमातील गीतांचे लेखन तो करणार आहे. हा एक मजेशीर कॉमेडी, रोमॅंटिक सिनेमा असणार आहे. यातील गाण्यांची चर्चा सिनेमा रिलीज होण्यापूर्वीपासून व्हायला हवी, असे आम्हाला वाटते आहे. आजकाल जर सिनेमा चांगला असेल, तरच त्यातील संगीतही लोकप्रिय होते. मला अशी गाणी लिहायची आहेत, ज्यांची स्वतःची काही ओळख असेल आणि त्या गाण्यांचा सिनेमाला उपयोग होईल. “बॅड बॉय’ सिनेमामध्ये मिथुन चक्रवर्तीचा सर्वात धाकटा मुलगा नमाशी आणि इनबॉक्स पिक्चर्सचे निर्माते साजिद कुरैशीची अमरीन या दोघांना लॉंच केले जाणार आहे. युवा प्रेक्षकांना हा सिनेमा सर्वाधिक आवडेल, असे म्हटले जाते आहे.
हिमेश अशाच प्रेक्षकांना डोळ्यासमोर ठेवून गाणी लिहीतो आहे. या सिनेमातील 5 नवीन गाण्यांवर सध्या तो काम करतो आहे. हल्ली जुन्या गाण्यांना नव्या ढंगात सादर करण्याचा ट्रेन्ड आहे. मात्र हिमेश हा ट्रेन्ड अनुसरणार नाही आहे. त्याला त्याच्या गाण्यांना नवीन संगीतातच सादर करायचे आहे.