ठाणे – ठाण्यात एका देहविक्रयाचा पर्दाफाश करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे या कारवाईत ठाणे क्राईम ब्रांचने दोन अभिनेत्रींना अटक केली आहे. एका खासगी सोसायटीत हा वेश्या व्यवसाय सुरू होता. ठाणे क्राईम ब्रांचला याची माहिती मिळताच धाड टाकून ही कारवाई केली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ठाण्यातील एका खासगी सोसायटीत देहविक्रयाचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती ठाणे क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा केल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकली. यावेळी घटनास्थळावरून पोलिसांच्या पथकाने 3 एजंटसह दोन अभिनेत्रींना अटक केली आहे.
ठाणे पोलिसांच्या क्राईम ब्रांच युनिट 1 ने एक मोठी कारवाई केली आहे. या दोन्ही अभिनेत्री देहविक्रयाच्या व्यवसायात लाखो रुपये घ्यायच्या अशी माहिती ठाणे पोलिसांनी दिली आहे. तर कोविड 19 च्या काळात चित्रिकरण बंद असल्याने या दोन्ही अभिनेत्री देहविक्रयाकडे वळाल्या, असे देखील तपासात समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे या देहविक्रयाची लिंक मुंबईतील अनेक मोठ्या अभिनेत्रींशी असल्याचे बोलले जात आहे.
या प्रकरणी आता ठाणे क्राईम ब्रांच आरोपींची कसून चौकशी करत असून यामागे एक मोठं रॅकेट असल्याची पोलिसांना शंका आहे.