मुंबई – बॉलिवूडचा रियल बागी म्हणजेच अभिनेता ‘टायगर श्रॉफ’ पुन्हा एकदा आपला जबरदस्त अॅक्शन अवतार दाखवण्यास सज्ज झाला आहे. ‘हिरोपंती’ चित्रपटाद्वारे टायगरने आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. या चित्रपटात टायगर बरोबर अभिनेत्री ‘क्रिती सेनन’ देखील मुख्य भूमिकेत दिसून आली.
दरम्यान, पुन्हा एकदा टायगर बॉक्स ऑफिसवर आपली हिरोपंती दाखवणार असून, नुकतंच “हिरोपंती 2” या चित्रपटाचे ऑफिशल पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. चित्रपटाच्या पोस्टरवर टायगरचा जबरदस्त लूक दिसून येत आहे. ‘हिरोपंती 2’ हा चित्रपट दि. 16 जुलै 2021 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
तसेच, येत्या 6 मार्चला टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांच्या बागी फ्रांचायजीतील ‘बागी 3’ हा चित्रपट रुपेरी पडद्यावर येणार आहे.