नवी दिल्ली – एका कथित जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात बुधवारी विशेष पीएमएलए न्यायालयाने झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या ईडी कोठडीत पाच दिवसांची वाढ केली.त्यांच्या आधीच्या पाच दिवसांच्या कोठडीची मुदत आज संपल्याने त्यांना कोर्टापुढे हजर करण्यात आले हेाते.
ईडीने त्यांच्या सात दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती पण कोर्टाने त्यांची पाच दिवसांची कोठडी मंजुर केली. सोरेन यांच्या वकिलांने न्यायालयात सांगितले की, आधीच्या पाच दिवसांत सारेन यांची १२० तास चौकशी झाली आहे. म्हणून, पुढील रिमांडची गरज नाही.
कथित गुन्ह्यात असलेल्या ८.५ एकर जमिनीच्या संदर्भात एफआयआर दाखल करण्यात आला आहे, असेही ते म्हणाले.लोकसभा निवडणुकीत त्यांनी प्रचारात भाग घेऊ नये म्हणून त्यांना कोठडीत डांबण्यात आल्याचा दावाही त्यांच्या वकिलांनी केला.