मुंबई – अभिनेत्री व खासदार हेमा मालिनी या त्यांनी ‘बिहू’ उत्सवावर केलेल्या ट्विटमुळे चांगल्याच ट्रोल झाल्या आहेत. त्यामुळे त्यांना अखेर माफी मागावी लागली आहे,. बोहाग बिहू किंवा रोंगाली बिहू, हा आसाममधील सर्वात मोठ्या सणांपैकी एक, सण आहे. कापणीच्या कालावधीची सुरूवात म्हणून हा सण साजरा होतो.
हिंदू सौर कॅलेंडरचा पहिला दिवस पंजाब, तामिळनाडू, ओरिसा, केरळ, मणिपूर, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये वेगवेगळ्या नावांनी आणि परंपरांनी साजरा केला जातो.बिहू हा आसामचा सण असताना हेमामालिनी यांनी तो बिहारचा सण असल्याचे आपल्या ट्विटमधे नमूद केले होते. त्यांच्या या चुकीच्या ट्विटमुळे त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. त्यामुळे आपण हे चुकीचे ट्विट केल्याबद्दल त्यांनी माफी मागत बिहु हा आसामचाच सण असल्याचे त्यांनी नंतरच्या ट्विट मध्ये नमूद केले आहे.
By mistake🙏I have put Bihu is a festival celebrated in Bihar. I am sorry! That should read Bihu, festival of Assam🙏 pic.twitter.com/WTjxEwkmPe
— Hema Malini (@dreamgirlhema) April 14, 2023