नगर -चर्मकार विकास संघाच्या पुढाकाराने तर अभ्युदय बॅंकेचे अध्यक्ष संदीप घनदाट यांच्या वतीने अकोले तालुक्यातील दुर्गम भागातील कामगारांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले. राज्यात चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर, प्रदेश सचिव प्रा.सुभाष चिंधे, मुंबई प्रदेशाध्यक्ष सुभाष मराठे यांच्या पुढाकाराने गटई कामगारांसह इतर कामगारांना जीवनावश्यक वस्तूंसह अन्न-धान्याचे वाटप सुरु आहे.
लॉकडाऊन सुरु झाल्यापासून हातावर पोट असलेल्या या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. गटई कामगार आर्थिक दुर्बल घटक असल्याचे त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक बनली आहे. दोन महिन्यापेक्षा अधिक कालावधी लॉकडाऊनमध्ये जात असताना दिव्यांग बांधव, विधवा व निराधारांना चर्मकार विकास संघाच्या वतीने जीवनावश्यक वस्तूसह किराणा व अन्न-धान्याचे वाटप सुरु आहे.
या उपक्रमासाठी अनेक दानशूर व्यक्तींचे सहकार्य मिळत आहे. नुकतेच अकोले तालुक्यातील दुर्गम भागात गरजूंना किराण किटचे वाटप करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ सामाजिक नेते रामदास सोनवणे, कारभारी देव्हारे, अर्जुन वाघ, प्रकाश डोळस, अमोल बोऱ्हाडे, संजय शिंदे, भाऊसाहेब चव्हाण आदी उपस्थित होते.