पिंपरी, – पुणे, मावळसह पिंपरी-चिंचवड परिसरात सध्या मुसळधार पावसामुळे “आसमानी’ संकट झेलणाऱ्या नदीकाठच्या नागरिकांना ढिम्म प्रशासनाच्या “सुलतानी’ कारभाराचेही फटके बसत आहेत. या पार्श्वभूमीवर माणुसकी दाखवत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे प्रबळ दावेदार शेखर ओव्हाळ यांनी शेखर ओव्हाळ युवा मंचतर्फे पूरबाधितांना मदतीचा आश्वासक हात देत त्यांच्या राहण्याची तसेच जेवणाची सोय केली. पालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी शेखर ओव्हाळ यांनी केलेल्या मदतीमुळे समाधान व्यक्त केले.
मुसळधार पावसामुळे पिंपरी-चिंचवड शहरात रविवारपासून पूरस्थिती निर्माण झाली असून रविवारपासून राष्ट्रवादीचे शेखर ओव्हाळ यांनी शहरातील नदीकाठच्या भागांना भेट देऊन तेथील स्थितीचा आढावा घेतला तसेच पूरबाधितांना मदतीचा हात देऊन माणुसकी जपली.
मुसळधार पावसामुळे तसेच पवना धरणातून सातत्याने पाण्याचा विसर्ग होत असल्याने दापोडी, कासारवाडी, पिंपरी, फुगेवाडी गावांमधील घरांमध्ये पाणी शिरले होते. या सर्व लोकांना जीवनावश्यक वस्तू, ब्लॅंकेट, खाद्यपदार्थ यांचे वाटप केले.