अफगाणिस्तानमध्ये पूराचे 13 बऴी

घोर (अफगाणिस्तान) – अफगाणिस्तानमधील घोर भागामध्ये आलेल्या पूरामुळे आतापर्यंत 13 जणांच मृत्यू झाला आहे. प्रांताचे राज्यपाल गुलाम नासिर काझी यांनी ही माहिती दिली. पूर आणि गुरुवारपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे किमान 100 घरांचे नुकसानही झाले आहे, असे शिन्हुआ या वृत्तसंस्थेच्या बातमीमध्ये म्हटले आहे.

या पूरामुळे प्रांतीय राजधानी फिरोझ कोह आणि शेजारील तोलाक आणि शहराक या जिल्ह्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या जिल्ह्यांमधील शेतजमीनीचेही मोठे नुकसान झाले आहे, असे काझी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

पूरामुळे झालेल्या वित्तहानीचे प्रमाण लक्षात घेऊन अफगाणिस्तानच्या सरकारने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मदतीचे आवाहन केले आहे. मानवतावादी दृष्टीकोनातून या आपत्तीचा सामना करण्यासाठी मदत करण्यात यावी, असे अफगाण सरकारने म्हटले आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.