पुण्यात उष्म्याचा तडाखा

तापमानाने गाठला दहा वर्षांतील उच्चांक


पुण्याचा पारा 41.8 अंश सेल्सिअसवर


पुढील 48 तासही अंगाची लाही-लाही करणारे

पुणे – शहरातील कमाल तापमान शुक्रवारी तब्बल 41.8 अंश सेल्सिअसपर्यंत पोहचले. हा आकडा मागील दहा वर्षांतील उच्चांक ठरला आहे. त्यामुळे सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत शरीर अक्षरश: भाजून निघत आहे. त्यामुळे एवढा कडका उन्हाळा “नको रे बाबा’, असे पुणेकर म्हणत आहेत.

अवकाळी पावसानंतर शहरासह जिल्ह्यात कमाल तापमानात झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या दहा वर्षांत 2009 मध्ये एप्रिलमध्येत सर्वाधिक कमाल तापमान 41.7 अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले आहे. त्यानंतर दि.26 एप्रिल रोजी सर्वाधिक 41.8 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. दोन दिवसांपासून शहरातील तापमान स्थिर असून, पुढील 48 तासांत कमाल तापमानात आणखीन वाढ होण्याची शक्‍यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.

तब्बल 120 वर्षांपूर्वीचे रेकॉर्ड मोडणार का?
पुणे शहरातील कमाल तापमान 41.8 अंशावर गेले. मात्र, एवढ्या कडक उन्हाळ्याची पुणेकरांना सवय नाही. त्यामुळे पुणेकर हैराण झाले आहे. मात्र, पुढील दोन दिवसांत कमाल तापमानात 42 अंशापर्यंत मजल मारेल, अशी शक्‍यता हवामान विभागाने वर्तविली आहे. दरम्यान, 120 वर्षांपूर्वी (30 एप्रिल 1897) शहरातील कमाल तापमान 43.3 अंश सेल्सिअसपर्यंत गेले होते. त्यामुळे यावर्षी हे रेकॉर्ड मोडणार का? एवढा कडक उन्हाळा नागरिकांना सोसणार का? असा प्रश्‍न आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.