हेल्थकॉन्शस अर्जुन

एकावेळी एकच चित्रपट करणाऱ्या अर्जुन रामपालकडे सध्या एकही नवा चित्रपट नाहीये. “नास्तिक’ या चित्रपटासाठी त्याची निवड झालेली आहे. पण त्याच चित्रीकरणही अद्याप सुरु झालेले नाही. अर्जुनचा शेवटचा रिलीज झालेला चित्रपट म्हणजे डॅडी दगडी चाळीचा डॉन अरुण गवळी याच्या जीवनावर आधारित असलेला हा चित्रपट तिकिट खिडकीवर साफ आपटला.

अर्जुन सांगतो की, सुदैवाने कहानी 2 आणि डॅडी या चित्रपटांनंतर लोकांची माझ्याबाबतची मते बदलली आहेत. “पलटन’ हा चित्रपट मी केवळ जेपी दत्ता यांच्यासाठी केला होता. पण डॅडीच्या चित्रीकरणाच्या वेळी मलाच समजायचे नाही की मी अभिनेता आहे की डॉन! 47 वर्षीय अर्जुन आपल्या आरोग्याबाबत अत्यंत सजग बनला आहे.

तो म्हणतो फिटनेस हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे. माझ्याबाबत सांगायचे तर मी टेनिस खेळतो, सायकलिंग करतो, पळतो, मेडिटेशनही करतो आहे. या सर्वांमुळे मला मिळणारा आनंद लक्षणीय आहे, असे अर्जुन सांगतो.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)