‘कोथिंबीर’ खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहे का ?

पालेभाज्यांचा वापर आपण रोजच्या आहारामध्ये आवर्जून करतो. कोथिंबीरचा वापर हा वेगवेगळ्या चटण्यांमध्ये केला जातो, त्यामुऴे पदार्थांचा स्वाद वाढण्यास मदत होते. कोथिंबीरमध्ये विविध प्रकारचे गुणधर्म आहेत. कॅल्शिअम, पोटॅशियम, विटॅमिन्स आणि मॅंगनीज यांच प्रमाण कोथिंबीरमध्ये मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे ते आरोग्यासाठी लाभदायक आहे. चला तर मग जाणून घेऊयात कोथिंबीरचे फायदे..

कोथिंबीरचे फायदे खालीलप्रमाणे –
1. कोथिंबीरच्या पानांमध्ये व्हिटॅमिन क, व्हिटॅमिन ब यांच प्रमाण भरपूर आहे, ज्यामुळे तुमचे शरिर स्वस्थ राहण्यासा मदत मिळते.

2. कोथिंबीरमध्ये फायबर आणि आर्यनचे प्रमाण अधिक असते, वजन कमी करण्यासाठी कोथिंबीर फायदेशीर ठरते.

3. कोथिंबीरच्या पानांमध्ये असलेल्या पोषक द्रव्यांमुळे रक्दाब नियंत्रणात राहतो.

4. मधुमेहींच्या रूग्णांसाठी कोथिंबीर अतिशय फायदेशीर आहे, त्यामुळे कोथिंबीरचा आहारात जरूर समावेश करा.

5. व्हिटॅमिन क च्या समावेशामुळे अल्जायमरसारखे आजार होण्याापासून कोथिंबीर रोखते.

Leave A Reply

Your email address will not be published.