नगर -जिल्हा रुग्णालयास प्राप्त झालेले संरक्षण किट “त्या’ अधिकाऱ्याने स्वत:च्या वाहनात ठेवले होते, अशी स्पष्ट कबुली जिल्हा शल्यचिकित्सक प्रदीप मुरंबीकर यांनी आज दस्तुरखुद्द पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या पुढ्यात दिली.
दैनिक प्रभातच्या प्रतिनिधीने या संदर्भात थेट पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनाच आज प्रश्न केला. त्यावर पत्रकार परिषद सुरू असतानाच पालकमंत्री मुश्रीफ यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे या प्रकाराबाबत विचारणा केली.
त्यावर 15 एप्रिल रोजी प्राप्त झालेली ही संरक्षण किट वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या स्वत:च्या वाहनात ठेवली होती. तथापि, ती वाटपासाठीच वाहनात ठेवली होती, असे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती वाहनात का, या प्रश्नावर गडबडलेल्या शल्यचिकित्सकांनी पुढील प्रश्नावर तातडीने मौन धारण केले.
दरम्यान, कार्यकर्ते ऍड. श्याम आसावा यांनीही या चौकशी समितीवर आक्षेप घेतला होता. त्या संदर्भात आसावा यांनी थेट आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे ट्विटद्वारे तक्रार केली होती. त्यामुळे आता पालकमंत्री चौकशीसंदर्भात कशी समिती नेमतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी आज दुपारीच चर्चा केली. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनीही पालकमंत्र्यांचे या गैरप्रकाराकडे लक्ष वेधल आहे. महामारीच्या संकटकाळात राज्यात असे गंभीर प्रकार घडत असतील, तर ते सरकारच्या आणि सरकारमध्ये सहभागी असलेल्या कोणत्याच पक्षाच्या “इमेज’साठी चांगले नाही, अशी भूमिका फाळके यांनीही मांडली. त्यामुळे पालकमंत्री यावर तातडीने ठोस भूमिका घेतली, अशी सर्वांनाच आशा आहे.
संजीव भोर संस्थापक-अध्यक्ष, शिवप्रहार संघटना, नगर.
संरक्षण किट “त्यांनी’ गाडीत ठेवले
ही किट 15 एप्रिल रोजी पोचली होती. त्यास पंधरा दिवसांपेक्षा अधिक कालावधी लोटला आहे. आता तर नगरची वाटचाल देखील करोनामुक्तीच्या दिशेने सुरू झाली आहे. त्यामुळे गरजेच्या वेळी ती किट वाहनात ठेवून या अधिकाऱ्यांनी काय मिळविले? तसेच आरोप झाल्यानंतर ती पुन्हा वाहनात आली का, असे विविध प्रश्न यातून निर्माण झाले आहेत.