भारतात कोरोना आला आणि लॉकडाऊनमुळे अनेक सैनिकांच्या सुट्ट्या रद्द झाल्या. जे गावी आले होते ते गावाकडेच राहिले तर जे सुट्टीवर घरी येणार होते. ते सैनिक आज लॉकडाऊनमुळे सेवा बजावत आहेत. काही सैनिकाचे लग्न होते तर कोणाच्या मुलीचे वाढदिवस!
अशा परिस्थितीत एका मुलीच्या आईने बुधवारी आपल्या मुलीचा जन्मदिन कसा साजरा केला जाईल याबद्दल उत्तर प्रदेश पोलिस आणि मथुरा पोलिस अधिकाऱ्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून संदेश पाठविला. गोविंद नगर परिसरातील महाविद्या कॉलनीत राहणारी या कुटुंबातील ही मुलगी आज एक वर्षाची झाली आहे. मुलीचे वडील सैन्यात आहेत आणि देशाच्या सीमेच्या सुरक्षेत तैनात आहेत.
त्यानंतर ‘यूपी -११२’ सेवेचे अधिकारी आणि पोलिस तीन कार व अनेक दुचाकीस्वार वाढदिवसाचा केक, बरेच बलून व भेटवस्तू इत्यादी घेऊन त्याच्या घरी पोहोचले. सैनिकाच्या मुलीचा पहिला वाढदिवस आईसह कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जो सर्वांसाठी अविस्मरणीय ठरला. दरम्यान कुटुंबीयांनी पोलिसांचे आभार मानले.