#HBDkarishmakapoor : लोलोचा आज वाढदिवस

अभिनेत्री करिश्मा कपूरचा आज ४५ वा वाढदिवस आहे. १९९१ साली चित्रपटसॄष्टीत पदार्पण केलेल्या करिश्माने कारकिर्दीत अनेक यशस्वी व्यावसायिक चित्रपटांतून कामे करत १९९०च्या दशकात आघाडीची अभिनेत्री म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत स्थान मिळवले. करिश्माला लोलो म्हणून घरी हाक मारली जाते. त्यातील लोलो हे नाव करिश्माची आई बबीताने तिला दिले.

राजा हिंदुस्थानी हा करिश्माच्या करिअरमधील सर्वात हिट सिनेमा ठरला. दिग्दर्शक डेविड धवनच्या राजा बाबू, अंदाज, कुली नं 1, जुड़वा, हिरो नं. 1, बीवी नं 1, हसीना मान जाएगी, दुल्हन हम ले जाएंगे, चल मेरे भाई यांसारख्या सिनेमामध्ये करिश्मा कपूरने भूमिका साकरल्या आहेत. करिश्मा २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘डेंजरर्स इश्क’ या चित्रपटात शेवटी झळकली होती. त्यानंतर फार कमी वेळा ती मोठ्या पडद्यावर आली.

करिश्मा कपूरचा आता कलाविश्वात म्हणावा तसा वावर राहिलेला नाही. बॉलिवूडच्या लोलोने गेल्या काही वर्षांपासून मोठ्या पडद्यापासून फारकत घेतली आहे. करिश्मा पडद्यावर जरी झळकत नसली तरीही ती सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. मात्र आता करिश्मा लवकरच मोठ्या पडद्यावर कमबॅक करणार आहे. एकता कपूरच्या आगामी वेबसीरिज मध्ये करिश्मा झळकणार असल्याचं सांगण्यात येत आहे. करिश्मा कपूरचे आजही तिचे लाखों चाहते आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.