प्रसिद्ध अभिनेते अनिल कपूर आणि नो एन्ट्री, वेलकम, सिंग इज किंग, वेलकम बॅक या चित्रपटाचे दिग्दर्शक अनिस बाझमी या दोघांच्या मुलाखतीचा कार्यक्रम झाला. सिनेअभिनेत्री तिस्का चोप्रा हिने या दोघांची मुलाखत घेतली.
बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता अनिल कपूरचे नाव घेतले की अजूनही खळखळत्या उत्साहाने भरलेला आणि तरुणांनाही लाजवेल असा फिटनेस याचं अचूक गणित जमलेला ‘टपोरी’ चेहरा डोळ्यासमोर येतो. बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर आपल्या डायलॉग डिलिव्हरीसाठी प्रसिद्ध आहेत.त्यांचे असे अनेक डायलॉग्स आहेत, जे आजही लोकांच्या ओठी रेंगाळत असतात. ‘
अनिल कपूर यांनी त्यांच्या ४० वर्षाच्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट दिले. ‘मशाल’, ‘तेजाब’, ‘बेटा (Beta)’, ‘मेरी जंग’, ‘कर्मा’, ‘जांबाज’, ‘दिल धड़कने दो’ आणि ‘मिस्टर इंडिया’ या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. तसेच त्यांनी ‘बधाई हो बधाई’ आणि ‘आयशा’ या चित्रपटांची निर्माती देखील केली.
अनिल कपूर यांनी बरेच वर्षे रुपेरी पडदा गाजवला. परंतु आजही अनिल त्यांच्या अभिनयाने तरुण पिढीवर भूरळ पाडतात. नुकताच अनिल कपूर यांनी चित्रपटसृष्टीमधील सुरुवातीचा प्रवास कसा होता हे सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टद्वारे सांगितले आहे.
From 1977 to 1983 I had been working …struggling to get that one defining chance that would change everything and #Woh7Din was that chance! A life changing moment & role! And since then it’s all been a dream come true! Till date I feel so blessed to be doing what I do! https://t.co/XEBwYOP8t7
— Anil Kapoor (@AnilKapoor) September 2, 2019
अनिल कपूर यांनी ट्विटरद्वारे त्यांच्या अभिनयाच्या दुनियेतील सुरुवातीचा १९७७ पासून १९८३ पर्यंतचा काळ फार कठीण असल्याचे सांगितले.
‘मी १९७७ ते १९८३ पर्यंत फार मेहनतीने काम करत होतो. मी अशा संधीची वाट पाहात होतो जी माझे आयुष्य बदलेल आणि अखेर ती संधी मला वो ७ दिन चित्रपटात काम करण्याने मिळाली. त्या चित्रपटातील भूमिका आणि अभिनयाने माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली’ असे अनिल कपूर यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे. तर आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याशी निगडीत अनेक किस्स्यांना सोशल मीडियावर ट्विट करत अनेक युजर्सनी बर्थडेच्या शुभेच्छा दिला आहे.
रामलखन, परिंदा या चित्रपटांत त्यांच्या जोडीला अभिनेता जॅकी श्रॉफही होते. त्यांची जोडी प्रचंड लोकप्रिय झाली. या चित्रपटांच्या चित्रीकरणादरम्यान अनेक किस्सेही घडले. या चित्रीकरणादरम्यान एकदा असं झालं की, अनिल कपूर यांना जॅकी श्रॉफ यांच्याकडून कानाखालीही खावी लागली. तीही एक दोन नव्हे तर तब्बल सतरा वेळा!
@AnilKapoor has always been a perfectionist when it comes to his shots. Here is @bindasbhidu sharing how it took 17 ‘hard’ takes to get the final cut for one of #Parinda‘s scenes. #30YearsOfParinda@MadhuriDixit pic.twitter.com/yWpratNupx
— Vidhu Vinod Chopra Films (@VVCFilms) October 31, 2019
हा किस्सा निर्माते विधु विनोद चोप्रा यांनी शेअर केला आहे. परिंदा या चित्रपटात जॅकी आणि अनिल यांनी एकमेकांच्या भावाचा रोल केला होता. त्यात एका प्रसंगात जॅकी हे अनिल यांच्या कानाखाली वाजवतात, असं दृश्य होतं. एकाच शॉटमध्ये हा सीन ओके झाला होता. पण, खुद्द अनिल यांना त्याची खात्री वाटत नव्हती. त्यामुळे त्यांनी या प्रसंगाचा रिटेक घ्यायला सांगितला.
रिटेक होऊनही अनिल यांचं समाधान झालं नाही. तेव्हा पुन्हा रिटेक घ्या असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे या सीनचे तब्बल 17 रिटेक घेण्यात आले आणि 17 वेळा जॅकी यांनी अनिल यांच्या कानाखाली मारलं.
चोप्रा यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. त्यावर थप्पड की गूंज आजभी सुनाई दे रहीं है, असं अनिल यांनी म्हटलं असून या ‘थप्पड’मध्ये माझं प्रेमच होतं, अशी प्रतिक्रिया जॅकी श्रॉफ यांनी दिली आहे.