मुंबई- गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या संजय दत्तच्या ‘प्रस्थानम’ चित्रपटाचा ऑफिशल ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. हा चित्रपट नऊ वर्षांपूर्वी आलेल्या ‘प्रस्थानम’ नावाच्याच तेलुगू चित्रपटाचा हिंदी रिमेक असणार आहे. काही दिवसांपूर्वी संजय दत्तने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून या चित्रपटाचे एक मोशन पोस्टर देखील शेअर केले होते.
‘प्रस्थानम’ मध्ये संजय दत्त बरोबर अभिनेत्री मनीषा कोईराला, अमायरा दस्तूर आणि अभिनेते जॅकी श्रॉफ, चंकी पांडे, आणि अली फजल हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसून येणार आहेत. त्यामुळे हा चित्रपट सिनेरसिकांसाठी एक चांगली मेजवानी असणार हे नक्कीच. ‘प्रस्थानम’ चित्रपट 20 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.
Sanju baba’s birthday and #PrasthanamTeaser, amazing! Happy birthday @duttsanjay. This year, power will not be inherited, it will have to be earned! https://t.co/ieD8pk0H12
— Jackie Shroff (@bindasbhidu) July 29, 2019