काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर रानू मंडलचा लता मंगेशकर यांच्या आवाजातील व्हिडीओ व्हायरल झाला होता. यानंतर हिमेश रेशमियानी तिला आपल्या चित्रपटात गाण्याची ऑफर दिली. आणि रानूचे नशीबच पालटले. आता असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
यामध्ये एक व्यक्ती शेतात उभे राहून पॉप सिंगर जस्टिन बीबरचे गाणे गात आहे. या व्हिडिओमध्ये हा व्यक्ती जस्टिन बीबरचे बेबी गाणे गात आहे. फोनमध्ये हे गाणे वाजत असून त्यासोबत तो गात आहे. सोबतच तो डान्स करतानाही दिसत आहे.
@hvgoenka sir, a Karnataka farmer singing Justin Bieber’s 2009 chartbuster Baby. I am sure you would love it pic.twitter.com/eiGNbAzkJS
— Anirrbaan Ghoshh ?? (@anirrbanghosh) December 17, 2019
या व्हिडिओत दिसणार व्यक्तीचे नाव प्रदीप असून तो कर्नाटकाच्या चित्रदुर्ग येथे राहणारा आहे. प्रदीपला इंग्रजीसह चायनीज आणि जापनीज भाषातील गाणीही खुप चांगल्या प्रकारे येतात.