बंगळुरू – भारतीय जनता पार्टीचे कर्नाटकातील नेते संजय पाटील यांनी कॉंग्रेस नेत्या आणि कर्नाटकातील महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या संदर्भात केलेल्या एका आक्षेपार्ह टिप्पणीमुळे वाद निर्माण झाला आहे. रात्री चांगली झोप येण्यासाठी एक अतिरिक्त पेग घेत जा, असा आक्षेपार्ह सल्ला पाटील यांनी दिल्यामुळे वातावरण तापले आहे. (‘Have Extra Peg’: Ex-BJP MLA Tells Woman Minister; Then Says ‘I Meant Energy Drink’)
बेळगाव येथे झालेल्या प्रचारसभेत पाटील यांनी हे विधान केले. ते म्हणाले की कर्नाटकच्या आठ वेगवेगळ्या भगांत त्यांनी प्रभारी म्हणून काम केले आहे. बेळगावमध्ये महिला मोठ्या प्रमाणात भाजपच्या समर्थनासाठी पुढे येत आहेत. त्यामुळे माझ्या वडिल भगिनी लक्ष्मी हेब्बाळकर यांना माझा सल्ला आहे की चांगली झोप येण्यासाठी त्यांनी झोपेची गोळी घ्यावी अथवा एक अतिरिक्त पेग घ्यावा.
संजय पाटील यांच्या विधानावर कॉंग्रेसने प्रत्युत्तर दिले आहे. संजय पाटील यांनी असे विधान करून सर्व महिलांवर टीका करून त्यांचा अपमान केला आहे. भारतीय जनता पार्टीची महिलांच्या विरोधातील वागणूक दिसते असून हे प्रकार वाढत चालले आहे, असे कॉंग्रेसने म्हटले आहे. जो कोणी महिलांकडे अशा दृष्टीने पाहु लागतो तेंव्हा समजायचे की त्याचे पतन सुरू झाले आहे.
भाजप आणि धर्मनिरपेक्ष जनता दल यांचे पतन सुरू झाले आहे. त्यामुळेच ते महिलांच्या विरोधात बोलू लागले आहेत. कौरवांप्रमाणे आणि रावणाप्रमाणे भाजप आणि जनता दलाचाही निश्चित विनाश होईल असे कॉंग्रेसने सोशल मीडियावरील आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. कर्नाटकात कॉंग्रेस आणि भारतीय जनता पार्टी असाच दुरंगी सामना आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने राज्यातील २५ जागा जिंकल्या होत्या. कॉंग्रेसला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले होते.