मुंबई : एकनाथ शिंदे यांनी बंड करून एक आठवडा झाला तरी अद्यापही आमदारांची मनधरणी करण्यात शिवसेनेला यश आले नाही. अद्यापही एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदार आपल्या मतावर ठाम आहेत. अशातच संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आजही आमच्या जवळचेच आहेत असे माध्यमांशी बोलताना म्हंटले आहे. शिवाय संजय राऊत बंडखोर आमदारांना भावनिक सादही घातली आहे. थोडा संयम ठेवा. डोंगर झाडी निसर्ग यात विवेक हरवू नका. असे ट्विट करीत म्हंटले आहे.
संजय राऊत यांनी केले परत येण्याचे आवाहन
संजय राऊत यांनी ट्विट केले आहे की , बाप बदलण्याची भाषा कोण करतंय आहे पहा..श्रीमान केसरकर.थोडा संयम ठेवा.डोंगर झाडी निसर्ग यात विवेक हरवू नका.आपण यांना ओळखता ना? जय महाराष्ट्र! ” यासोबत गुलाबराव पाटील यांचा एक व्हिडीओ देखील आहे. हे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे. यापूर्वी एका बंडखोर आमदाराची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. यात गुवाहाटी मधील काय झाडी , काय डोंगर , काय हॉटेल … असे वक्तव्य होते. सोशल मीडियावर ही ऑडिओ क्लिप चांगलीच व्हायरल झाली होती. त्यावरूनच आता संजय राऊत यांनी ट्विट करत थोडा सायं ठेवा . डोंगर झाडी निसर्ग यात विवेक हरवू नका असं म्हंटलं आहे.