पुणे : राज्यात प्रथम टप्प्यात 488 शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित करण्यात येणार आहे. या आदर्श शाळा योजनेला “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजना’ हे नाव देण्यात येणार आहे.
सन 2021-22 वर्ष स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. देशाच्या इतिहासात अनेक महापुरुषांनी देशासाठी व समाजासाठी अहोरात्र कार्य करून सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्टा जोपासली आहे. त्यांच्या सेवेचा वारसा आजही देशवासियांसाठी आदर्श, मार्गदर्शक व दिशादर्शक ठरत आहे. आदर्श शाळा ही शासनाची महत्त्वकांक्षी योजना असून, तिची व्याप्ती व स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष या अनुषंगाने योजनेस महापुरुषांचे नाव देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.