भिंड : चंबलचे खोरे म्हंटले की खतरनाक डाकूंची आठवण आल्याशिवाय रहात नाही. गेल्या काही वर्षांमध्ये चंबळ खोऱ्यातील डाकूंचा प्रभाव कमी झाला असला तरी आता पुन्हा एकदा या खोऱ्यामध्ये डाकू दिसू लागले असून आणि त्यामध्ये काही महिला डाकू आहेत. जीन्स आणि टी-शर्ट या आधुनिक पेहरावातील या डाकू हसीनानी चंबळ खोऱ्यामध्ये पुन्हा एकदा दहशत निर्माण केली आहे. नव्याने सक्रिय झालेल्या या टोळ्यांमध्ये अकरा पुरुष आणि दोन महिला डाकू आहेत.
काही दिवसापूर्वी या टोळीने एका शेतकऱ्याचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला होता. या शेतकऱ्याला बंदुकीचा धाक दाखवून दोन डाकूंनी नेले होते. या दोन डाकूंनी या शेतकऱ्याला या दोन डाकू हसीनापर्यंत नेले होते व त्यानंतर या शेतकऱ्याला चालणे शक्य न झाल्याने या डाकूंनी त्या शेतकऱ्याला तेथेच सोडले होते. हा शेतकरी जेव्हा गावात परत आला तेव्हा त्याने ही सर्व माहिती इतर गावकऱ्यांना सांगितली आणि टोळीमध्ये दोन महिला या असल्याची गोष्ट समोर आली आहे.
ही माहिती पोलिसांना कळताच पोलीस मोठी कुमक घेऊन घटनास्थळी आले त्यांनी परिसर पिंजून काढला पण त्यांना या टोळीचा मागमूस लागला नाही. पण गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे गेल्या काही दिवसांमध्ये अचानक होणाऱ्या गोळीबाराच्या घटनाही वाढल्या आहेत.
रात्री-अपरात्री गोळीबाराचे आवाज येत आहेत या गावांमध्ये काही हत्यार बंद तरुण फिरत असल्याची माहिती गावकऱ्यांना गेल्या काही दिवसापासून मिळत होती. पण आता हे सगळे हत्यारबंद युवक म्हणजे या टोळीचे सदस्य होते हे सिद्ध झाले आहे. चंबळच्या खोऱ्यात डाकूची टोळी पुन्हा सक्रिय झाली असून त्यामध्ये काही महिलांचा समावेश असल्याचे लक्षात आल्याने पोलीसही चक्रावून गेले आहेत. या टोळीला पकडण्यासाठी पोलास पोलिसांनी आता सक्रिय केली आहे.