अनुपम संकलेचाचे ४ बळी
रोहतक : रणजी करंडक स्पर्धेत दुस-या दिवशी महाराष्ट्राविरूध्द खेळताना हरियाणाचा पहिला डाव १२४.२ षटकात ४०१ धावांवर संपुष्टात आला आहे. रोहतक येथील लाहिली येथे ही लढत सुरू आहे.
Innings break: Haryana – 401/10 in 124.2 overs (S P Kumar 40 off 86, A H Hooda 0 off 5) #HARvMAH @paytm #RanjiTrophy
— BCCI Domestic (@BCCIdomestic) December 10, 2019
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना हरियाणा संघाने शुभन रोहिला आणि शिवम चौहान याच्या शतकी खेळीच्या जोराच्या पहिल्या डावात ४०१ धावांचा डोंगर उभारला आहे. दोघांनी पहिल्या डावात तिस-या विकेटसाठी २२१ धावांची भागिदारी रचली. शुभम रोहिला याने २८५ चेंडूत १४२ तर शिवम चौहान याने २०८ चेंडूत ११७ धावा काढल्या. तर हिमांशू राणाने ३७ आणि सुमीतकुमारने ४० धावा केल्या.
A A Sanklecha 4 WICKETS! (26.2-5-82-4), Haryana 401/10 #HARvMAH @paytm #RanjiTrophy
— BCCI Domestic (@BCCIdomestic) December 10, 2019
महाराष्ट्राकडून अनुपम संकलेचा याने २६.२ षटकांत ८२ धावा देत ४ गडी तर एस एस बच्छाव याने २३ षटकांत ७६ धावा देत ३ गडी बाद केले. याव्यतिरिक्त समद फल्ला, प्रदीप दाढे आणि चिराग खुराणा यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.