माझी प्रकृती पूर्णपणे ठीक – लता मंगेशकर

मुंबई : गानसाम्राज्ञी लता मंगेशकर या गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात होत्या, मात्र उपचारानंतर ब्रीच कँडी हॉस्पिटलमधून नुकतेच घरी सोडण्यात आले. याबाबत लतादीदीं ट्विटद्वारे चाहत्यांचे आभार मानून सर्वांना त्या सुखरूप असल्याचे कळवले होते.


त्यांचे हे ट्वीट पाहून त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला होता. सध्या या ट्विटला रिट्विट करत चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

लतादीदींनी ट्विट केले आहे की,’नमस्कार. गेल्या २८ दिवसांपासून मी ब्रीच कँडी रूग्णालयामध्ये होते. मला न्युमोनिया झाला होता. प्रकृती पूर्णपणे ठीक झाल्यानंतरच मी घरी जावं, अशी डॉक्टरांची इच्छा होती. आज मी घरी आले आहे. ईश्वर, आईवडिलांचे आशिर्वाद आणि तुमच्या सगळ्यांचं प्रेम आणि प्रार्थनांमुळे मी आता ठीक आहे. मी तुम्हा सगळ्यांची मनापासून आभारी आहे. ब्रीच कँडीमधील डॉक्टर खरच देवदूत आहे. तेथील सर्व कर्मचारी खुपच चांगले आहेत. तुम्हा सगळ्यांचे मी पुन्हा मनापासून आभार मानते. हे प्रेम आणि आशिर्वाद असेच राहू द्या,’  दरम्यान, लतादीदीं यांचा लता मंगेशकर यांचा रुग्णालयातील एक फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.