आळेफाटा- आळंदी येथे झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत आळेफाटा (ता. जुन्नर) येथील विद्यार्थी हर्षद पाटील उपविजेता ठरला आहे. राज्य क्रीडा व युवक सेवा संचलनालय व जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या माध्यमातून आळंदी येथील जोग महाराज व्यायामशाळेत या कुस्ती स्पर्धा झाल्या. या स्पर्धेत आळे येथील ज्ञानमंदीर हायस्कूलचा विद्यार्थी हर्षद पाटील याने चौदा वर्ष वयोगट व पस्तीस किलो वजनी गटात तालुका, जिल्हा व विभागीय कुस्ती स्पर्धेत चमकदार कामगिरी करत राज्यस्तरीय स्पर्धेपर्यंत मजल गाठली.
या स्पर्धेतही त्याने उत्कृष्ट कामगिरी केली. मात्र, तो उपविजेता ठरला. त्याने मिळविलेल्या या यशाबद्दल ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष भाऊशेठ कुऱ्हाडे, उपाध्यक्ष उल्हास सहाणे, सचिव बाळासाहेब गुंजाळ, खजिनदार रोहिदास संचालक, संपत गुंजाळ, किशोर कुऱ्हाडे, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, गंगाराम गुंजाळ, प्रसन्न डोके, बबन सहाणे, अर्जुन पाडेकर, अरुण हुलवळे, राजेंद्र कुऱ्हाडे यांनी अभिनंदन केले. हर्षद पाटील यास धर्मवीर संभाजीराजे कुस्ती संकुलाचे प्रशिक्षक पैलवान दत्ता गावडे, संजय गुंजाळ, बाळासाहेब कुऱ्हाडे यांचे मार्गदर्शन लाभले.