कल्की भगवान यांचा घबाड योग… अबब… 500 कोटीची अघोषित मालमत्ता

चेन्नई : अध्यात्मिक गुरू कल्की भगवान यांच्या दक्षिण भारतात पसरलेल्या अनेक मालमत्तांवर टाकलेल्या छाप्यात तब्बल 500 कोटी रुपयांची अघोषित मालमत्ता सापडली. यात 409 कोटी रुपयांच्या बेहिशेबी पावत्यांचा समावेश आहे, अशी माहिती प्राप्तीकर विभागाने दिली.

43.9 कोटी रुपयांचे भारतीय चलन तर 18 कोटी रुपये किमतीचे अमेरिकन चलनासह 93 कोटी रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. त्यात सोने आणि हिऱ्यांचा समावेश आहे, असे प्राप्तीकर खात्याच्या निवेदनात म्हटले आहे. कर कमी असणाऱ्या देशांत या समुहातर्फे गुंतवणूक करत असल्याचे आढळून आले आहे. देशातील अर्थव्यवस्थेबाहेच्या प्रप्तीकर योग्य उत्पन्नाच्या शोध मोहीमेत हे छापे टाकण्यात आले, असे सांगण्यात आले.

घबाड
भारतीय चलन 43.9 कोटी रुपये
अमेरिकन चलन 18 कोटी रूपये
सोने (88 किलो) 26 कोटी रूपये
हिरे (1271 कॅरेट) 5 कोटी रुपये
एकूण जप्त मालमत्ता 93 कोटी रुपये

ट्रस्ट आणि कंपनीच्या मिळून एकूण 40 मालमत्तांवर हे छापे टाकण्यात आले. ही शोधमोहीम अद्याप सुरू आहे. चेन्नई, हैदराबाद, बंगळुरू आणि आंध्रप्रदेशातील वरडैहपालम येथे हे छापासत्र राबवण्यात आले. या ठिकाणी या अध्यात्मिक गुरूचे सत्संग आणि आशिर्वचन कार्यक्रम घेत असत. यासाठी पदेशी ग्राहकांना निवासी शिबिरासाठी निमंत्रित केले जात असे. त्यांच्याकडून भरभक्कम शुल्क परकीय चलनाच्या स्वरूपात स्वीकारले जात असे. रिअल इस्टेट, कन्सस्ट्रक्‍शन आणि खेळ अशा विविध क्षेत्रात हा समुह देशात अणि परदेशात गुंतवणूक करत असे. कल्की भगवान आणि त्यांचा मुलगा हे सारे व्यवहार पहात असे.

हा समुह पावत्या लपवून त्यातून विदेशात गुंतवणूक करत आहे. तसेच देशांत मालमत्ता खरेदी करत आहे, अी माहिती प्राप्तीकर खात्याला मिळाली. त्यानुसार हे छापासत्र राबवण्यात आले. मालमत्ता रोखीत विकून किंवा त्याची कमी दाखवून या समुहाने आणखी बेहिशेबी मालमत्ता जमवल्याची शक्‍यता आहे. 2014 -15 या आर्थिक वर्षापासून अशी बेहिशेबी रोकड अंदाजे 409 कोटी रूपये असावी. तेथील महत्वाच्या कर्मचाऱ्याकडे याबाबतची काही कागदपत्रे सापडली असल्याचे सुत्रांनी सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)