दानोळीतील गावठी हातभट्टीवर छापा

कोल्हापूर : शिरोळ तालुक्यातील दानोळी येथे राज्य उत्पादन शुल्क इचलकरंजी विभागाने आज छापा घातला. दोन तासाहून अधिक काळ सुरू असणाऱ्या कारवाईत कच्च्या रसायनासह 94 हजार 50 रूपयांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला आहे.

लोखंडी पिंप 18, प्लास्टिक पिंप 4, होज पाईप 10, प्लास्टिक पिशव्या 10 व कच्चे रसायन 4 हजार 50 लिटर असा एकूण 94 हजार 50 रूपये किंमतीचा मुद्देमाल प्रोव्हिबिशन गुन्ह्यात जप्त करून नष्ट करण्यात आला.

ही कारवाई विभागीय उपायुक्त वाय. एम. पवार, अधीक्षक गणेश पाटील, उपअधीक्षक बी. आर. चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक पी.आर. पाटील, दुय्यम निरीक्षक शिवाजी कोरे, अतुल पाटील, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गणपती हजारे, जवान विजय माने, सुभाष कोल्हे, विलास पवार आदींच्या पथकाने केली.

अशा प्रकारे कोणत्याही ठिकाणी अवैध मद्य निर्मिती, साठा अथवा विक्री आढळून आल्यास संबंधितावर कडक कारवाई करून यापुढेही अशा प्रकारची मोहीम राबविण्यात येणार असल्याचे निरीक्षक पी. आर. पाटील यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.