मुंबई – “तुझ्यात जीव रंगला…’ या मालिकेतील रानदा आणि पाठक बाई अर्थात अभिनेता ‘हार्दिक जोशी’ व अभिनेत्री ‘अक्षया देवधर’ हे 2 डिसेंबर रोजी विवाह बंधनात अडकले आहेत. मालिकेमध्ये या जोडीला चाहत्यांनी जितकं प्रेम दिल तितकच प्रेम यांना एकत्र आल्यानंतर चाहते देताना दिसत आहेत. रानदा आणि पाठक बाकी यांच्या सोशल मीडियावरील पोस्टला चाहते भरभरून शुभेच्छा देत आहेत. या दोघांच्या लग्नाची सोशल मीडियावर एक वेगळीच हवा पाहायला मिळाली आहे.
त्यांचे चाहते सुरूवातापासूनच हार्दिक आणि अक्षया यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहात होते. अतिशय राॅयल पध्दतीने यांचा विवाह सोहळा पार पडला. यांचे लग्न हे पुण्यात पार पडले आहे. दरम्यान, ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत ‘राणा दा’ हे पात्र साकारणारा हार्दिक आजही प्रेक्षकांच्या मनावर आधिकाराज्य गाजवत आहे.
View this post on Instagram
उंचपुरा, पिळदार शरीरयष्टी अश्या ‘राणा’च्या शर्टलेस लूकने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला असून, ‘पाठक बाईं’ म्हणजेच अक्षया देवधर देखील त्याच्या पिळदार बॉडीच्या प्रेमात पडली आहे. सध्या त्याचा हा दमदार लूक सगळीकडे व्हायरल होत आहे.
फॅन्स देखील यावर कमेंटचा वर्षाव करत आहे. पण यात एक कमेंट मात्र लक्ष वेधून घेत आहे ती आहे पाठकबाई अर्थात त्याची पत्नी अभिनेत्री अक्षया देवधरची. तिनं हार्दिकच्या व्हिडीओवर हार्ट इमोजी पोस्ट केला आहे. तर हार्दिकच्या एका चाहत्यानं ‘फक्त राणादा..’ असं म्हंटलं आहे. सध्या हार्दिकनं मालिकांकडून आपला मोर्चा सिनेमाकडं वळवला आहे.