#HappyBirthday: बॉलिवूडचे ‘डिस्को डान्सर’ मिथुन चक्रवर्ती

बॉलिवूडचे ‘डिस्को डान्सर’ मिथुन चक्रवर्तीयांचा आज जन्मदिवस. 16 जून 1952 रोजी  जन्मलेल्या मिथुन दा यांचे खरे नाव फार कमी लोकांना ठाऊक असेल. होय, गौरांग चक्रवर्ती हे त्यांचे खरे नाव.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mithun Chakraborty fan base (@mithun__chakraborty_) on


एकेकाळी बॉलिवूड प्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणा-या मिथुन चक्रवर्ती यांनी अनेक हिट चित्रपट दिलेत. पण रिल लाईफपेक्षा त्यांची रिअल लाईफ अधिक चर्चेत राहिली.


श्रीदेवी आणि मिथुन यांच्या लव्ह लाईफचे किस्से सगळ्यांनाच ठाऊक आहेत. मिथुन यांनी श्रीदेवींशी गुपचूप लग्न केले होते, असे म्हटले जाते.

 

View this post on Instagram

 

A beautiful happy family ……

A post shared by Mithun Chakraborty fan base (@mithun__chakraborty_) on


मिथुनदांच्या पत्नी योगिता बाली यांच्याविषयी आपण सगळेच जाणतो. 1979 मध्ये मिथुन यांनी योगिता बाली यांच्याशी लग्न केले होते. आजही दोघे सोबत आहेत. पण योगिता बाली यांच्याआधी मिथुन यांची पहिली पत्नीही होती. तिचे नाव आहे हेलेना ल्यूक. चित्रपट आणि नाटकांच्या माध्यमातून त्यांनी आपल्या अंगी असलेले अभिनयाचे रंग प्रभावीपणे प्रेक्षकांसमोर मांडले. मिथुनदा यांनी अनेक पात्र चोखपणे निभावल्या अशा या ‘डिस्को डान्सर’ बहुआयामी कलाकाराला 67व्या वाढदिवसानिमित्त दैनिक प्रभात कडून हार्दिक शुभेच्छा!

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)