हॅपी बर्थ डे ‘धरम पाजी’

मुंबई – बॉलिवूडचे ‘ही मॅन’ अशी ओळख असलेले प्रसिद्ध अभिनेते ‘धर्मेंद्र’ आज आपला 84 वा वाढिवस साजरा करत आहेत. त्यांचा जन्म 8 डिसेंबर 1935 ला झाला होता. 1960 साली धर्मेंद्र यांनी आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती.

त्यांच्यानंतर त्यांचा थोरला मुलगा सनी देओल याने सिनेसृष्टीवर राज्य केले. तसेच सनीनंतर एन्ट्री झाली ती बॉबी देओलची. सध्या धर्मेंद्र यांच्या तिसऱ्या पिढीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.

धर्मेंद्र हे आपल्या शानदार अभिनय आणि आपल्या हटके अंदाजासाठी ओळखले जातात. धर्मेंद्र आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांची लव्ह स्टोरी कोणत्याही सिनेमापेक्षा कमी नाही. सनी आणि बॉबी हे धर्मेंद्र आणि त्यांच्या पहिल्या पत्नी ‘प्रकाश कौर’ यांची मुले आहेत.

तर त्यांची दुसरी पत्नी हेमामालिनी आहे. धर्मेंद्र आणि हेमा यांची कन्या ईशा देओल हिनेदेखील सिनेसृष्टीत नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला पण तिला यामध्ये यश मिळू शकले नाही.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.