विठ्ठलवाडी ग्रामपंचायतीसाठी शांततेत मतदान

मंचर- विठ्ठलवाडी (ता. आंबेगाव) येथील ग्रामपंचायत सदस्य निवडीसाठी मतदान प्रक्रिया रविवारी (दि.8) रोजी शांततेत पार पडली. सोमवारी (दि.9) घोडेगाव येथील तहसील कार्यालयात मतमोजणी होणार आहे.
विठ्ठलवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी ललिता संदीप चिखले यांची बिनविरोध निवड झाली.

ग्रामपंचायतीच्या एकूण आठ सदस्यांपैकी सरपंच आणि तीन सदस्य बिनविरोध निवडले आहेत. बिनविरोध निवडून आलेल्या सदस्यांची नावे पुढीलप्र्रमाणे-शितल शशिकांत ढगे, जयश्री संतोष चिखले, लता गुलाब चिखले. वॉर्ड क्रमांक 1 मधून सर्वसाधारण पुरुष गटासाठी दुरंगी लढत कैलास चिखले आणि प्रतीक चिखले, वॉर्ड क्रमांक 2 मधून माजी सरपंच सुहास चिखले आणि संजय चिखले, वार्ड क्रमांक 2 मधून ओबीसी महिला जागेसाठी प्राजक्ता भालेराव आणि अर्चना चिखले, वॉर्ड क्रमांक 3 मधून ओबीसी पुरुष जागेसाठी संजय भालेराव आणि संजय चिखले यांच्यासाठी मतदान प्रक्रिया झाली.

Leave A Reply

Your email address will not be published.