विहारीने तिसऱ्या क्रमांकावर यावे

निवड समितीचे माजी अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी व्यक्त केले मत

नवी दिल्ली – नियमित कर्णधार विराट कोहली मायदेशी परतत असल्याने पुढील कसोटी सामन्यांत हनुमा विहारीने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करायला पाहिजे, असे मत निवड समितीचे माजी अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी व्यक्त केले आहे.

कोहलीच्या जागी विहारी फलंदाजीला आला तर त्याला जास्त वाव मिळेल. तसेच खेळपट्टीवर स्थिरावण्यासाठी वेळही मिळेल. वेगवान तसेच फिरकी गोलंदाजी खेळताना अचानक गोलंदाजीत होत असलेले पदल विहारीला लवकर अवगत करता येतील.

तसेही भारतीय संघाची मधली फळी कोहलीच्या अनुपस्थितीत काहीशी कमजोर होईल, त्यामुळे विहारी जर त्या क्रमांकावर फलंदाजीला आला तर मधल्या फळीला बळकटी येईल, असेही प्रसाद म्हणाले.

लोकेश राहुलला संघात स्थान मिळाले तर त्याने विहारीच्या जागी म्हणजेच सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येण्याची गरज आहे. त्यामुळे तळातील फलंदाजांना साथील घेत त्यांचाही आत्मविश्‍वास वाढेल, असेही प्रसाद म्हणाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.