अटकेची टांगती तलवार; कोर्टाचा इशारा मिळताच पंगा क्वीन न्यायालयात हजर

मुंबई – सतत वादाच्या भोवऱ्यात राहणारी बॉलिवूडची क्वीन म्हणजेच अभिनेत्री “कंगना रणावत’ला अंधेरी न्यायालयाकडून इशारा देण्यात आला आहे. मानहानी प्रकरणी पुढील सुनावणीस गैरहजर राहिल्यास अटक वॉरंट बजावण्यात येईल असे न्यायालयाकडून सांगण्यात आले आहे. यानंतर अखेर कंगना सुनावणीसाठी न्यायालयात हजर झाली आहे.

आतापर्यंत कंगना एकाही सुनावणीला हजर झालेली नाही. या उलट आपण प्रत्येक सुनावणीला हजर राहात आहोत. त्यामुळे सतत गैरहजर राहणाऱ्या कंगनाविरोधात अटक वॉरंट बजावण्याची मागणी अख्तर यांच्या वतीने करण्यात आली.

कंगना गेल्या महिन्याभरापासून चित्रीकरणात व्यस्त होती. शिवाय तिला करोनाची देखील लक्षणे होती.  त्यामुळे १४ सप्टेंबरला पार पडलेल्या सुनावणीत कंगनाला. करोनाची चाचणी करता यावी यासाठी तिला मंगळवारच्या सुनावणीला गैरहजर राहण्याची मुभा देण्याची विनंती कंगनाच्या वतीने न्यायालयाला करण्यात आली होती.

त्याच वेळी कंगना पुढील सुनावणीच्या वेळी गैरहजर राहिली तर तिच्याविरोधात अटक वॉरंट बाजण्यात येईल असा इशारा सुद्धा न्यायालयाने दिला होता. त्यामुळे अखेर आज २० सप्टेंबरला सुनावणीसाठी न्यायालयात तिने हजेरी लावली आहे.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.