वॉशिंग्टन – अलकायदाचा प्रमुख हमजा बिन लादेन हा अमेरिकेसाठी धोकादायकच होता असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. तथापी त्यांनी हमजाच्या निधनाच्या वृत्ताबद्दल मात्र कोणतीही प्रतिक्रीया देण्यास नकार दिला आहे. मी त्याविषयी कोणतीही प्रतिक्रीया देणार नाही. पण तो आमच्यासाठी धोकादायकच होता असे त्यांनी म्हटले आहे.
तो आमच्या देशाविषयी अत्यंत विखारी शब्दप्रयोग वापरत होता असे ट्रम्प यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले.हमजा बिन लादेन हा अमेरिकेने केलेल्या कारवाईत ठार झाल्याचे वृत्त आहे. पण त्या वृत्ताला अमेरिकेने अजून कोणताही दुजोरा दिलेला नाही. त्याच्या निधनाचे वृत्त न्युयॉर्क टाईम्सने दिले आहे. ओसामा बिन लादेनाच्या निधनानंतर त्यानेच अलकायदाची सूत्रे हाती घेतली होती. तो जेमतेम 30 वर्षांचा होता.