टेनिस स्पर्धेत प्रज्ञेशचे आव्हान संपुष्टात

लॉस काबोस (मेक्‍सिको) – भारताच्या प्रज्ञेश गुणेश्‍वरनचे एटीपी टेनिस स्पर्धेतील आव्हान दुसऱ्या फेरीतच संपुष्टात आले. अमेरिकेच्या फ्रिट्‌झ टेलरने त्याचा 4-6, 6-3, 6-2 असा पराभव केला.

प्रज्ञेशने पहिल्या सेटमध्ये सर्व्हिस व परतीच्या फटक्‍यांवर चांगले नियंत्रण मिळविले होते. मात्र नंतर टेलरने पासिंग शॉट्‌सचा सुरेख खेळ केला. तसेच त्याने बिनतोड सर्व्हिस करीत प्रज्ञेशला संधी दिली नाही. दुसऱ्या व तिसऱ्या सेटमध्ये प्रज्ञेश सर्व्हिस व परतीच्या फटक्‍यांबाबत खूप चुका करीत सामना गमावला.

दुहेरीत भारताच्या दिविज शरणने जोनाथन एलरीचच्या साथीत उपांत्यपूर्व फेरीकडे वाटचाल केली. त्यांनी बेन मॅकलॅचियन व जॉन पॅट्रिक स्मिथ यांचा 7-5, 6-1 असा सरळ दोन सेट्‌समध्ये पराभव केला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.