वाघोली – वाघोली (ता. हवेली) येथील रामेश्वर प्रासादिक दिंडीचे माजी अध्यक्ष तथा राम मंदिर वाघोली यांचे अध्यक्ष व ग्रामपंचायतीचे माजी सदस्य मच्छिंद्र लक्ष्मण दाभाडे (वय ६५) यांचे निधन झाले. त्यांच्या पक्षात दोन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामभाऊ दाभाडे यांचे ते बंधू होत.
मच्छिंद्र दाभाडे यांच्या निधनाने वाघोली मध्ये राजकीय, सामाजिक व आध्यात्मिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे. त्यांच्या अंत्यविधीचे दर्शन घेऊन अनेक नागरिकांनी माणूसपण जपणारा माणूस हरवल्याची भावना व्यक्त केली आहे. (दि. 27) रोजी सकाळी आठ वाजता वाघेश्वर मंदिर वाघोली येथे दशक्रिया विधीचा कार्यक्रम होणार आहे.