कोपरगाव – भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी सकाळी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर येथील शहर व तालुका भाजपच्या कार्यालयात जल्लोष करण्यात आला.
माजी आमदार स्नेहलता कोल्हे व विधीज्ञ रवींद्र बोरावके यांनी पेढे वाटून, फटाके फोडत गुलालाची मुक्तपणे उधळत करत आनंद साजरा केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयास पुष्पहार घालण्यात आला.
यावेळी भाजपचे शहराध्यक्ष कैलास खैरे, शिल्पा रोहमारे, श्वेतांबरी राउत, युवा मोर्चाचे वैभव आढाव, पराग संधान, रिपाईचे जितेंद्र रणशुर, विनोद राक्षे, नारायण अग्रवाल, हाशमभाई पटेल, नगरसेवक सत्येन मुंदडा, सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, आजीमाजी नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.