पंढरपूर : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर सजले आहे. पंढरपूरात भाविकांनी विठूमाऊलीच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे. आज पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पत्नी लता शिंदे तसेच मानाचे वारकरी दाम्पत्य भाऊसाहेब मोहिनीराज काळे व मंगल भाऊसाहेब काळे यांच्यासोबत विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा केली. यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही महाराष्ट्रातील विठ्ठल भक्तांना आषाढी एकादशीच्या मराठीतून शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत लिहिले की, “सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. हा शुभ दिवस आपल्याला वारकरी परंपरेला अनुसरुन भक्ती, नम्रता आणि करुणा हे भाव अंगीकारण्याची प्रेरणा देवो. भगवान विठ्ठलाच्या आशीर्वादाने, सुखी, शांतताप्रिय आणि सर्वसमावेशक समाजाच्या निर्मितीसाठी आपल्याला नेहमी एकत्र काम करता येऊ दे. जय हरी विठ्ठल!”
सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. हा शुभ दिवस आपल्याला वारकरी परंपरेला अनुसरुन भक्ती, नम्रता आणि करुणा हे भाव अंगीकारण्याची प्रेरणा देवो. भगवान विठ्ठलाच्या आशीर्वादाने, सुखी, शांतताप्रिय आणि सर्वसमावेशक समाजाच्या निर्मितीसाठी आपल्याला नेहमी एकत्र काम करता येऊ दे. जय…
— Narendra Modi (@narendramodi) June 29, 2023
आज बकरी ईदही आहे. यानिमित्तानेही नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. “ईद-उल-अधाच्या शुभेच्छा. हा दिवस सर्वांना सुख-समृद्धी घेऊन येवो. तसेच आपल्या समाजात एकोप्याचा आणि सलोख्याचा भाव टिकून राहो. ईद मुबारक!” असं ट्वीट नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
Greetings on Eid-ul-Adha. May this day bring happiness and prosperity to everyone. May it also uphold the spirit of togetherness and harmony in our society. Eid Mubarak!
— Narendra Modi (@narendramodi) June 29, 2023
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विठूरायाच्या चरणी साकडं
दरम्यान, “बळीराजाला चांगले दिवस येऊ देत, त्याच्यावरचे संकट दूर होऊ दे. पाऊस पडू दे, राज्य सुजलाम्, सुफलाम् होऊ दे. शेतकरी, कष्टकरी, कामगार, वारकरी, धारकरी असा राज्यातील प्रत्येक घटक सुखी समाधानी होऊ देत. त्याच्या आयुष्यात चांगले दिवस येऊ देत,” असे साकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आषाढी एकादशीच्या मुख्य शासकीय महापूजेवेळी विठूरायाच्या चरणी घातले.